108
Share
@dawriter

अस्पृश्यता Vs आरक्षण

0 9       

आज आपण बाबासाहेबांची 126 वी जयंती साजरी करत आहोत. पण खरचं ते जर आज अस्तित्वात असते तर ह्या समाजाची अवस्था बघून शरमेणे बेहाल झाले असते.

2500 वर्षापासून चालत आलेल्या रूढ़ी परंपरा नष्ट व्हाव्यात आणि माणसाला माणुसकीची वागणूक मिळावी व समाजातील उच्च वर्ण आणि निच्च वर्ण (so called) ह्यमधील दरी मिटवी त्यासाठी त्यानी आपले सम्पूर्ण जीवन निछावर केले.

पण एवढ्या वर्षानंतर सुद्धा 21व्या शतकात आपण बघतो तर चित्र काही उलटलेले दिसत नाही फक्त बघण्याचा दृष्टिकोण मात्र थोडा बदललेला आहे. आधी उच्च वर्ण आणि निच्च वर्ण ह्यामधे भेद होता, पण आता मात्र OPEN आणि (SC/ST/OBC) मध्ये.

बाबासाहेबांनी आरक्षणाची संकल्पना सामाजिक तथा शैक्षणिक दृष्टया मागासलेल्यांना पुढे नेता यावं तसेच जे आधीच विकसित(सामाजिक तथा शैक्षणिक ) आहेत त्यांच्या सोबत स्पर्धा करता यावं ह्या उद्देश्याने अमलात आणली गेली होती. मात्र हे लक्षात न घेता त्याला आर्थिक स्थिति कडे विषयांतर करुन दोन समाजामध्ये तनवाचे वातावरण निर्माण करण्याचे कार्य सुरु आहेत. तस बघता आरक्षण हे आर्थिक दृष्टया मागासलेल्यांना नाही कधी दिले गेले आणि नाही कधी दिले जाणार.

आरक्षणाचे विभाजन बघता, OBC-27% SC-15% ST-7.5% आहे. समस्त मिळून हे 49.5% होत व उर्वरित म्हणजेच 50.5% हे पूर्ण पणे OPEN वर्गासाठी उपलब्ध आहेच. त्यात काही वाद नाही.

पण कस आहे ना, आपल्याला बस भांडायला आवडते. आपल्याकडे काय आहे त्यापेक्षा आपल्याकडे काय नाही ह्या मध्ये आपण आपली ऊर्जा वाया घालवत असतो. इथे जो आरक्षणाचा लाभार्थी आहे तो बाबासाहेबांच्या नावावर राजकरण करतो आणि जो नाही तो मात्र टीका करत बसतो.

पण कुणीही त्या माणसाला (डॉ. आंबेडकरांना)थोडा तरी वाचून घेण्याचा किंवा जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता (काही अपवाद सोडले)तर कदाचित ही परिस्थिती उत्पन्नचं झाली नसती,आणि अस्पृश्यता नष्ट झाली असती सोबतचं आरक्षण सुद्धा...!

#viwes are personal, not intended to harm anybodies emotions..!Vote Add to library

COMMENT